सेलिब्रिटी डायरी: भूषण पाटील

 

भूषण पाटील हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक हँडसम हंक ‘बर्नी’ या त्याचा आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ओळख - माय आयडेन्टिटी' या चित्रपटातून पदार्पण करून आपल्या उत्तम अभिनयाने भूषणने समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या गुड लुक्स आणि किलर फिजीकने ‘बर्नी’ या चित्रपटातून देखील तो प्रेक्षकांचे मन देखील जिंकून घेईल.

आणखी जाणून घ्या मराठी धमाल डॉटकॉमसोबत 'सेलिब्रिटी डायरी' या विशेष सदरात.

जन्म दिनांक :  १८ नोव्हेंबर १९८५

जन्मस्थळ :  परभणी

आवडतं ठिकाण : पॅरिस, गोवा

आवडता पदार्थ : नॅचरल्स आईस क्रीम (माझी विकनेस)

सेलिब्रिटी नसता तर : सिविल इंजिनियर

आवडता सिनेमा : वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, नटसम्राट, दुनियादारी, ट्रॉय, थॉर, ग्लॅडिएटर आणि अॅवेन्जर्स,

तुमचं रोल मॉडेल :  अजय देवगण, अंकुश चौधरी,  ब्रॅड पिट

फिटनेस फंडा : फिटनेस इज माय लाईफस्टाईल

तुमचा दिवस कशामुळे छान होतो? : शुटींग

कोणत्या गोष्टीची चीड  येते?: जेव्हा लोक मला गृहीत धरतात  

तुमच्या आत्मचरित्राची शेवटची ओळ कोणती असेल?:  स्वतःला कमी लेखू नका आणि दुसऱ्यांनाही..