‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकाने मारली हॅट्रिक

 

सोनल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने ‘२८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत’ हॅट्रिक मारली आहे.

या ‘महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धे’मध्ये मिहिर राजदा लिखित 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला आहे. या नाटकातील प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार उमेश कामतला उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक मिळाले आहे तर स्पृहा जोशीला पण उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक मिळाले आहे.

स्त्री आणि पुरुष कलाकार यांचा उत्कृष्ट अभिनयाचा आणि सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार डोण्ट वरी बी हॅप्पी या नाटकाने मिळवून हॅट्रिक मारली आहे.