EXCLUSIVE: ‘घंटा-टोस्ट’ने केला ‘घंटा’चा ट्रेलर लॉन्च

 

सध्या सगळीकडे चर्चा असलेल्या ‘घंटा’या धमाल विनोदी चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर अत्यंत नावीन्यपूर्ण पध्दतीने, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले.

आता लवकरच वाजणार ‘घंटा’-

http://www.marathidhamaal.com/news/annoucement-of-ghanta

महेश मांजरेकर, संजय मोने, जितेंद्र जोशी यांसारख्या कसलेल्या कलावंतानी ‘घंटा’ चित्रपटातील अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यां कलाकारांचा घंटा-टोस्ट केला आणि उपस्थित पाहुणे मंडळी हास्यकल्लोळात बुडून गेली. या घंटा-टोस्टच्या तावडीतून अमृता खानविलकरसारखी अभिनेत्रीही सुटली नाही.

मोशन पोस्टरमधून वाजली ‘घंटा’-

http://www.marathidhamaal.com/news/ghantaa-motion-poster-released

या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणा-या पुष्कर श्रोत्री याने या घंटा-टोस्ट मध्येही सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका बजावत सगळ्यांना खुमासदार पध्दतीने झुंजवले. एकूणच, या घंटा-टोस्टमुळे हा चित्रपट कसा असेल, याची जबरदस्त उत्कंठा उपस्थितांमध्ये निर्माण झाली.

अमेय,सक्षम आणि आरोहचा ‘घंटीजर’ पाहिला का?-

http://www.marathidhamaal.com/news/seen-the-ghanteaser-of-amey-saksham-and-aroh 

‘घंटा’ हा आरोह-सक्षम-अमेय या त्रिकुटाने केलेल्या उचापतींनी भरलेला चित्रपट आहे. मुंबईत स्ट्रगल करत असलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात, यांचं खुमासदार चित्रण दिग्दर्शक शैलेश काळे यांनी या चित्रपटात केले आहे.  तरुणाईच्या विषयावरचा, तरुणाईच्या भाषेतला हा चित्रपट जरी असला तरी तो सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा आहे.

‘घंटा’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरला सोशल मिडीयावर अनेक लाईक्स-

http://www.marathidhamaal.com/news/ghantaa-posters-create-history-with-its-trend-on-social-media

दशमी स्टुडियोज, ब्रम्हपुत्रा पिक्चर्स आणि यल्लो INC प्रस्तुत ‘घंटा’ या चित्रपटात अभिनेते अमेय वाघ, आरोह वेलणकर, सक्षम कुलकर्णी यांच्यासह अनुजा साठे, शिवानी सुर्वे, किशोर कदम, पुष्कर श्रोत्री, भाऊ कदम आदी कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.  येत्या १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘घंटा’ वाजणार.