EXCLUSIVE: प्रार्थनाच्या ‘अनान’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

 

अभिनेत्री प्रार्थना बेहरेची प्रमुख भूमिका असलेल्या अनान या तिच्या आगामी चित्रपटाचे टीझर पोस्टर काही दिवसांअगोदर प्रदर्शित करण्यात आले आणि आता या चित्रपटाच्या टीमने त्यांच्या चित्रपटातील संगीत प्रकाशित केले आहे. अनान चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.

'रोहन थिएटर्स' चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते तर इंडस्ट्रीतील इतर अनेक नामवंत कलाकारांनी आवर्जून ह्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

'अनान'चे टिझर पोस्टर-  

http://www.marathidhamaal.com/news/check-out-teaser-poster-of-prarthana-beheres-next-film-anaa

'अनान' चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळावेगळा विषय आपल्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवणारा आकर्षक टिझर नुकताच लॉंच झालेला असून या चित्रपटातून एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने  मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या सौरभ – दुर्गेश ह्या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या 'गंधी सुगंधी', 'एक सूर्य तू', 'काहे तू प्रित जगायी'  यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेल्या गाण्यांना जेव्हा सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांसारख्या स्वराधीपतींच्या मधुर स्वरांनी साद घातला जातो तेव्हा मैफिलीला रंग तर चढणारचं ना!

या सूरांनी सजलेल्या मैफलीत 'अनान' चित्रपटातील एकूण 5 गाण्यांपैकी 3 गाणी लाँच करण्यात आली. ही पाच ही गाणी दिग्दर्शक राजेश कुष्टे यांच्या लेखणीतून अवतरलेली आहेत. या चित्रपटाच्या टीझर पोस्टरला एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि टीझर पोस्टरचे व्ह्युज पाहता संगीताला देखील प्रेक्षकांची अशीच दाद मिळेल याची खात्री वाटते.

'अनानया चित्रपटातून 'रोहन थिएटर्सचे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया निर्माते म्हणून मराठीत पदार्पण करत असून या चित्रपटाची कथा हेमंत भाटीया यांची आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलं आहे तर पटकथा – संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शनाबरोबरच गीतलेखनाची धुरा ही राजेश कुष्टे यांनी पेलली आहे. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रदिग्दर्शन राज कडूर यांनी केलं आहे. 

रोहन थिएटर्स निर्मित अनान’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

पाहा टीझर-