अभिनेता संजय मोने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तिमत्व अभिनेता संजय मोने आज यांचा वाढदिवस.  अभिनयासह त्यांनी लेखनामध्ये पण त्यांचं कौशल्य दाखवून दिलं आहे.  रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली.  टाइम बरा वाईट, क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि सध्याचा भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांना लिखाणाची पण आवड आहे.  त्यांची विनोदाची शैली वेगळी असते आणि ती प्रेक्षकांना खास पसंद आहे. संशय कल्लोळ, साडे माडे तीन, इट्स ब्रेकिंग न्युज, पक पक पकाक या चित्रपटांतील संवाद संजय यांनी लिहिले होते. अभिनय, लिखाण या त्यांच्या गोष्टी प्रसिध्द तर आहेच पण त्याचबरोबर त्यांची खवय्येगिरी पण प्रसिध्द आहे.

अभिनेता संजय मोने यांना वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता मराठी धमाल डॉट कॉम तर्फे हार्दिक शुभेच्छा!