'हिच्यासाठी कायपण' लवकरच प्रदर्शित

 

भविष्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्हीच तुमचे भविष्य घडवले पाहिजे असा आशय मांडणारा ‘हिच्यासाठी कायपण’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद दास्ताने यांनी केले आहे ज्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणाच्या वडीलांची भूमिका साकारली आहे.

कथा - पटकथा-संवाद संतोष पवार यांचे असुन चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज यांचे आहे, गीते जगदीश पिंगळे यांची असुन त्याला वैशाली सामंत,जावेद आली,आनंद शिंदे आणि हर्षित अभिराज यांनी स्वरसाज चढवला आहे.

मंगेश देसाई,भार्गवी चिरमुले,निर्मिती सावंत,विजय चव्हाण,नागेश भोसले,सोमनाथ माळी, श्रीनिवास कुलकर्णी अशी कलाकारांची तगडी फौज चित्रपटात पहायला मिळेल, चित्रपटाचे कथानक विनोदी असून तो निर्मात्यांना नक्कीच आवडेल असा निर्मात्यांना विश्वास वाटतो.