‘इश्क प्रेम लव - प्रेमाची T 20’ येतोय लवकरच

 

‘इश्क प्रेम लव - प्रेमाची T 20’ हा नवा सिनेमा लवकरच झळकतोय. नुकतंच या सिनेमाचं वृत्त हाती आलं आहे. हे प्रेम जमलं तर चांगलं नाहीतर विकून टाका अशी आकर्षक टॅगलाईन या सिनेमाची आहे. नावावरूनच सिनेमा रोमॅण्टीक कॉमेडी दिसतोय.

पीएसजे एन्टरटेन्मेट प्रस्तुत ‘इश्क प्रेम लव - प्रेमाची T 20’ ची निर्मिती शेखर ज्योती यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा पवन सदिने यांनी सांभाळलीय. आजच्या फास्ट लाईफमधील मॉर्डन लव्हस्टोरी या सिनेमात रेखाटण्यात आली आहे. वैभव तत्ववादी, श्री मुखी, हर्षवर्धन, विथीका, विष्णू, रितू यांच्याबरोबरच उषा नाडकर्णी, किशोर कदम, अरूण कदम, अभिजीत चव्हाण आदी कलाकार प्रमुख भूमिकेत सिनेमात पाहायला मिळतील.

‘इश्क प्रेम लव - प्रेमाची T 20’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.