आशियाई चित्रपट महोत्सवात ‘परतु’ची बाजी, किशोर कदम ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

 

चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये नितीन अडसूळ दिग्दर्शित ‘परतु’ चीच धूम पहायला मिळाली. यासिनेमाने सर्वोत्कृष्ट अभिनेता (किशोर कदम) आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा या दोन महत्त्वाच्यापुरस्कारांवर ‘परतु’ ने आपली मोहोर उमटवली. ‘विदेशी रसिकांचीही यावेळी सिनेमाने भरघोस दाद मिळवली. आंतरराष्ट्रीय ज्युरी, निवड समितीचे सर्व सदस्य व सिनेसृष्टीशी संबधित अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स'  या नामांकित कंपनीने ‘परतु’ची निर्मिती केलीय. जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील २८ सिनेमे या पुरस्कारांच्या अंतिम शर्यतीत होते. या पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नितीन अडसूळ म्हणाले, ‘दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटाला एवढा मोठा बहुमान मिळावा यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही”. “आपल्या मराठमोळ्या सिनेमा संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आशियाई चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांचा आभारी आहे. ‘परतु’ या सिनेमाचे यश हे सर्व टीमचे आहे,” अशी भावना अभिनेता किशोर कदम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा कलाकारांच्या ‘परतु' सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.