‘बस स्टॉप’ची प्रदर्शित तारीख जाहिर; पाहा कलाकारांचे मजेशीर ‘बस स्टॉप’ ट्विट्स

 

मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, अमृता खानविलकर, सिध्दार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, अक्षय वाघमारे, रसिका सुनील, सुयोग गोरे आणि मधुरा देशपांडे यांच्या ‘बस स्टॉप’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत अनेक जण आहेत. नुकतीच या चित्रपटाची प्रदर्शित तारीख जाहिर करण्यात आली आहे.

'ऑनलाईन – बिनलाईन' आणि  ' बघतोस काय मुजरा कर ' या सिनेमाच्या यशानंतर तरुण चित्रपट निर्माता आणि मराठी गायक रॅपर श्रेयश जाधव ‘बसस्टॉप’ हा सिनेमा घेऊन येत आहे.

गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलं असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांची देखील यात महत्वाची भूमिका आहे. गतवर्षाचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 

या चित्रपटात अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी या कलाकारांच्या पण प्रमुख भूमिका आहेत. तसेच तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..

चित्रपटाची प्रदर्शित तारीख जाहिर झाल्यावर या चित्रपटातील कलाकारांनी पण मजेशीर ट्विट करुन प्रदर्शित तारीख ठळकपणे दर्शवली आहे.

पाहा कलाकारांचे ‘बस स्टॉप’ विषयीचे ट्विट्स-