संस्कृती कला दर्पणची सर्वाधिक नामांकने 'डोंट वरी बी हॅप्पी' आणि 'कट्यार काळजात घुसली'ला जाहीर

 

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपली विशेष मोहर उमटवली आहे. गेली १६ वर्षे सातत्याने मनोरंजन कलाकृतींना आणि त्यातील कलावंतांना नावाजणाऱ्या या पुरस्कारांमध्ये चित्रपट, व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि वृत्त वाहिनी अशा एकूण चार विभागातील नुकतीच नामांकने जाहीर झाली आहेत. नाटक विभागातील नामांकन यादीत 'तिन्ही सांज', 'दोन स्पेशल', 'परफेक्ट मिस मॅच', 'ऑल दि बेस्ट २', 'डोंट वरी बी हॅप्पी' आणि 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट नेपथ्य, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, लक्षवेधी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नाटक या विभागातील पुरस्काराकरिता चुरशीची स्पर्धा रंगली आहे.

तर सिनेविभागातील पुरस्कारांवर सध्याच्या गाजत असलेल्या सिनेमांनी स्थान मिळवले आहे. त्यात 'कट्यार काळजात घुसली' आणि 'नटसम्राट' आघाडीवर आहेत, तसेच संदूक आणि मितवा या चित्रपटांनाही विशेष नामांकन देण्यात आलेले आहेत. सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन, संगीत,गीतरचना, पार्श्वगायिका, छायांकन, रंगभूषा, संकलन, संवाद, पटकथा, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता अशा एकूण ११ पुरस्कारांसाठी 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाला नामांकन प्राप्त झाली आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'नटसम्राट' ची इतर नामांकनाबरोबरच सर्वात लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला असून, दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनय सम्राट पुरस्कार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय यंदाच्या १६ व्या संस्कृती कलादर्पण रजनी पुरस्कार फेस ऑफ द इयर-२०१६ चा पुरस्कार अभिनेता स्वप्नील जोशीला देण्यात आला, तर अभिनेत्री मानसी नाईकला स्टाईल आयकॉन २०१६ घोषित करण्यात आले. 

नाट्य विभागातील पुरस्कारांसाठी एकूण सहा सर्वोत्कृष्ट नाटकांची निवड करण्यात आली. त्यात शेवग्याचा शेंगा, डोंट वरी बी हॅप्पी, ऑल दि बेस्ट २, परफेक्ट मिस मॅच, दोन स्पेशल आणि तिन्ही सांज या नाटकांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण २७ नाटकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, तसेच ६ व ७ एप्रिल दरम्यान झालेल्या चित्रपट महोत्सवात ११ सिनेमे दाखवले गेले. यंदाच्या वर्षी चित्रपट विभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंगा पतंगा,कोती,डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली होती.

 

१६ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 

नाटक विभाग नामांकन 

सर्वोत्कृष्ट  बालकलाकार घोषित 

  अथर्व बेडेकर 

(सोबतीने चालताना )

सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेत्री  नामांकन 

१. ऋतुजा देशमुख 

( सेल्फी )

२. शाल्मली टोळ्ये 

( तिन्ही सांज )

३. कादंबरी कदम 

( शेवग्याच्या शेंगा )

सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेता नामांकन 

१. मिहिर राजदा 

(डोन्ट वरी बी हॅप्पी )

 

२. अभिजित पवार 

( ऑल दी बेस्ट-२ )

 

३. संदेश जाधव 

( स्पिरिट )

 

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री नामांकन 

१. मयुरेश पेम 

( ऑल दी बेस्ट-२ )

 

२. समीर चौगुले 

( श्री बाई समर्थ )

३. संदीप रेडकर 

( जाऊ द्या ना भाई )

४. वनिता खरात 

( श्री बाई समर्थ )

५. ऐश्वर्या पाटील 

( जाऊ द्या ना भाई )

लक्षवेधी अभिनेत्री नामांकन 

१. निर्मिती सावंत 

( श्री बाई समर्थ )

२. सुकन्या कुलकर्णी 

(सेल्फी )

३. सुप्रिया विनोद 

(इंदिरा )

लक्षवेधी अभिनेता नामांकन 

१. अभिजित गुरु 

(तळ्यात मळ्यात )

२. संजय मोने 

( शेवग्याच्या शेंगा )

३. अंगद म्हसकर 

(तिन्ही सांज )

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन 

१. गिरीजा ओंक 

(दोन स्पेशल )

२. शीतल क्षीरसागर

( तिन्ही सांज )

३. अमृता सुभाष 

( परफेक्ट मिसमॅच)  

४. स्पृहा जोशी 

(डोन्ट वरी बी हॅप्पी )

५. स्वाती चिटणीस 

( शेवग्याच्या शेंगा )

सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन 

१. उमेश कामत 

(डोन्ट वरी बी हॅप्पी )

२. जितेंद्र जोशी 

(दोन स्पेशल )

३. अरुण नलावडे 

( श्री बाई समर्थ )

४. संजय मोने 

( शेवग्याच्या शेंगा )

५. मिलिंद शिंदे 

( अभीर गुलाल )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन 

१. गजेंद्र अहिरे 

( शेवग्याच्या शेंगा )

२. अव्दैत दादरकर 

(डोन्ट वरी बी हॅप्पी )

३. क्षितिज पटवर्धन 

(दोन स्पेशल )

 

४. देवेंद्र पेम 

(ऑल दी बेस्ट २) 

 

५. मंगेश कदम 

( परफेक्ट मिसमॅच)  

 

सर्वोत्कृष्ट नाटक २०१६ नामांकन 

१. तिन्ही सांज - त्रिकुट निर्मित 

२. शेवग्याच्या शेंगा - श्री चिंतामणी निर्मित 

३. डोन्ट वरी बी हॅप्पी - सोनल प्रॉडक्शन 

४. दोन स्पेशल - अथर्व आणि मिश्री थिएटर

५. ऑल दी बेस्ट २ - अनामय निर्मित 

६. परफेक्ट मिसमॅच - सोनल प्रॉडक्शन 

 

१६ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 

चित्रपट विभाग 

 

सर्वोकृष्ट बालकलाकार नामांकन

१. अज्ञेश मुंडशिंगकर - कोती 

२. रुपेश बने - सिंड्रेला 

३. दिव्येश मेदगे - कोती 

४. चैतन्य बडवे- सुरक्या 

५. यश देसाई - श्यामची शाळा 

६. शरयू सोनावणे - आटली बाटली फुटली 

७. अनिरुद्ध चव्हाण - रोपट 

 

सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन

१. संदीप पाठक - रंगा पतंगा 

२. शशांक शेंडे - ख्वाडा

३. शंकर महादेवन - कट्यार काळजात घुसली 

४. किशोर कदम - परतु 

५. हेमंत ढोमे - ऑनलाईन बिनलाईन

 

 सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन

१. प्रार्थना बेहेरे - मितवा 

२. रेणुका शहाणे - हायवे 

३. भार्गवी चिरमुले - संदुक 

४. मृण्मयी देशपांडे - कट्यार काळजात घुसली 

५. नेहा महाजन - नीलकंठ मास्तर 

 

लक्षवेधी अभिनेता नामांकन 

१. प्रशांत दामले - भो भो

२. स्वप्निल जाधव - जजमेंट 

३. संजय कुलकर्णी - कोती 

 

प्रथम पदार्पण अभिनय नामांकन 

१. गश्मीर महाजनी - देऊळबंद

२. प्रितम कागणे - हलाल 

३. भाऊसाहेब शिंदे -   ख्वाडा

 

सर्वोकृष्ट अभिनेता  नामांकन 

१. सुमित राघवन - संदुक 

२. अंकुश चौधरी - डबलसीट

३. मकरंद अनासपुरे - रंगा पतंगा 

४. संतोष जुवेकर - एक तारा 

५. गश्मीर महाजनी - देऊळबंद

 

सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकन

१. मुक्ता बर्वे - डबलसीट

२. मेधा मांजरेकर - नटसम्राट

३. स्मिता तांबे - परतु 

४. पूजा सावंत - नीलकंठ मास्तर 

५. उर्मिला निंबाळकर - एक तारा 

 

प्रथम पदार्पण दिग्दर्शन नामांकन 

१. प्रसाद नामजोशी - रंगा पतंगा 

२. प्रविण तरडे - देऊळबंद

३. सुहास भोसले - कोती 

४.  भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा

५. चंद्रकांत कणसे - दगडी चाळ 

 

लक्षवेधी चित्रपट घोषित 

कोती - ओम्स आर्ट्स 

 

सामाजिक चित्रपट नामांकन 

१. पोलीस लाईन 

जिजाऊ क्रिएशन

२. हक्क   

अॅम्बीशियस फिल्म्स 

३. देऊळबंद

वटवृक्ष एंटरटेनमेंट प्रा. लि. 

 

लोकप्रिय चित्रपट नामांकन 

१. दगडी चाळ - साईपूजा फिल्म आणि  एंटरटेनमेंट

२. डबलसीट - हयुज प्रॉडक्शन, प्रतिसाद  प्रॉडक्शन

३. नटसम्राट - फिनक्राफ्ट मिडिया आणि गजानन चित्र 

 

 

विशेष पुरस्कार घोषित 

१. अभिनय सम्राट पुरस्कार - नाना पाटेकर- नटसम्राट 

 २. विशेष ज्युरी पुरस्कार - विक्रम गोखले-  नटसम्राट 

 

मानाचा मुजरा २०१६

सचिन पिळगावकर - कट्यार काळजात घुसली 

 

सर्वोकृष्ट चित्रपट २०१६ नामांकन 

१. नटसम्राट - फिनक्राफ्ट मिडिया आणि गजानन चित्र 

२. कट्यार काळजात घुसली - श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस 

३. ख्वाडा - चित्राक्ष निर्मिती 

४. हलाल - अमोल कागणे फिल्मस 

५. रंगा पतंगा - फ्लाईंग गॉड फिल्मस 

६. मितवा - मीनाक्षी सागर प्रोडक्शन