राजकरणावर भाष्य करणारा 'शासन'

 

‘शासन’ हा राजकारणावर आधारीत नवा सिनेमा लवकरच झळकतोय. प्रसिध्द दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंनी या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चतुरस्त्र धुरा सांभाळलीय. श्रेया फिल्म्स प्रा.लि. प्रस्तुत ‘शासन’ या सिनेमाची निर्मिती शेखर पाठक यांनी केलीय.

जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, भरत जाधव, मकरंद अनासपुरे,सिध्दार्थ जाधव, किरण करमरकर, मनवा नाईक, नागेश भोसले, डॉ. श्रीराम लागू व स्व.विनय आपटे अशी सिनेमात कलाकारांची मांदियाळीच आहे. या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ‘शासन’ मध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.