सुनील शेट्टी आणि अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते 'अ ब क'चा शुभारंभ

 

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि मा. अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी 'लायन' फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी  आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

ग्रॅव्हेटी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट या पुढे सामाजिक विषयावरील दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवणार आहे. असे मत निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्या मराठी चित्रपट उत्तुंग यश संपादित करत आहे. या चित्रपटात मी हि काम करतोय मला मराठी चित्रपट खूप आवडतात.

मी उत्तम मराठी बोलतो.  ‘अ ब क’ हा हि चित्रपट खूप यश संपादन करेल याची मला खात्री आहे. अशी भावना अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली.

सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. अशी भावना व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मिहीर कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

'अ ब क' या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करणार असून चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आबा गायकवाड यांचे आहेत. तर संगीत राहुल रानडे यांचे आहे. या चित्रपटात सनी पवार सह नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना  भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा आदी दिग्ग्ज कलावंत काम करणार आहेत.

या चित्रपटाचे वैशिष्टय असे कि हा चित्रपट एकाच वेळी मराठी,हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायण करणार असून चित्रपटाचे चित्रिकरण १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.