थरारक 'दगडी चाळ'चा ट्रेलर लॉन्च

 

       १९९६ची मुंबई... तेव्हाची मुंबईतील परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली 'दगडी चाळतिच्या नावाचा सर्वत्र दबदबा होता. याच दगडी चाळीवर आधारित 'दगडी चाळहा सिनेमा लवकरच झळकतोय. त्यामुळे सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतच या सिनेमाचं ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे.

     

 काही दिवसांपूर्वीच या  सिनेमाचा टिझर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीझ करण्यात आला. पण हा टिझर पाहून ‘डॅडी’ उर्फ अरूण गवळींची मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वत्र उत्सुकता होती. पण आता असं कळतंय कीअभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे अरूण गवळींची व्यक्तिरेखा साकारत असल्याचं या ट्रेलर म्हणून दिसत आहे. अॅक्शन आणि ड्रामाने भरपूर असलेल्या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरीपूजा सावंतसंजय खापरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे ‘दगडी चाळ’ हा सिनेमा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

      मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चंद्रकांत कानसे यांनी दिग्दर्शन केलं आहे. ‘दगडी चाळ’ हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.