या महिन्यात तुमच्या ‘मॉम’ सोबत नक्की पाहा 'अ डॉट कॉम मॉम'

 

 

मा, आई, मम्मा, मम्मी, अम्मा, मॉम...

अचानक सुरुवातीलाच आम्ही आईच्या वेगवेगळ्या नावाने का सुरुवात केली असा प्रश्न तुम्हांला पडला असेल नासोशल मिडीयावर आई आणि मुली यांच्या प्रेमातील नात्यावर अनेकदा या चित्रपटाच्या नावाच्या पोस्टरवर कॅप्शन देण्यात आले होते.  आता मॉमवर आधारित या चित्रपटाची प्रदर्शित तारीख सांगण्यात आली आहे.

डॉ. मिना नेरुरकर लिखित आणि दिग्दर्शित 'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटाच्या प्रदर्शित तारीखसह नवं कोरं पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'अ डॉट कॉम मॉमया चित्रपटाची कथा एका लहान शहरातील मध्यमवर्गीय आईची कथा आहे.  या चित्रपटात विक्रम गोखलेविजय चव्हाणआशा शेलारराम कोल्हटकरडॉ. मीना नेरुरकरमकरंद भावेमानसी करंदीकरमदुवंती भटसियाली सिंहडॉ. देवेन गबाळेअपूर्वा भालेरावडॉन स्कॉटकॅरी सुलीवनरफेल डिप्पासई गुंडेवार कलाकार मंडळी यामध्ये आहेत.

'९व्या गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर आयोजित करण्यात आले होते. आणि त्यादरम्यान तेथे उपस्थित प्रेक्षकांनी चित्रपटाला मनापासून प्रतिसाद दर्शविला.  संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांकडून कौतुकाची दाद मिळवण्याची आता वेळ आली आहे. 

तुमचे काही प्लॅन असतील किंवा नसतील देखील, तरी तुमच्या मॉमला घेऊन ३० सप्टेंबर रोजी 'अ डॉट कॉम मॉम' चित्रपट नक्की पाहायला जा आणि एन्जॉय करा.