उलगडलं ‘मधू इथे अन् चंद्र तिथे’चं फर्स्ट पोस्टर

 

‘मधू इथे अन् चंद्र तिथे...’ हे गाणं सर्वज्ञातच आहे. याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. मधुचंद्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. पण मधू इथे अन् चंद् तिथे अशी अवस्था झाल्यावर काय धमाल घडते  ह्यावर आधारीत ‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ हा विनोदी रोमॅण्टीक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकतंच या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर उलगडलं.

झी टॉकीज प्रस्तुत ‘मधू इथे अन् चंद्र तिथे’सिनेमाचं दिग्दर्शन संजय झंकार ह्यांनी केलं असून सिनेमाच्या निर्मितीची धुरा झी टॉकीज आणि रत्नाकर जगताप यांनी सांभाळलीय. सिनेमात भाऊ कदम, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे या कलाकारांसह नवोदित नायक-नायिकेची जोडी झळकणार आहे.

‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ येत्या 12 जून रोजी प्रदर्शित होत आहे.