अदिती उर्फ अभिनेत्री सुरूची अडारकरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

‘का रे दुरावा’ मालिकेतील साधी,सोज्वळ आणि समजूतदार अदिती ही नायिका साकारून अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे सुरूची अडारकर. ह्या मालिकेतील भुमिकेमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. अवघा रंग एकची झाला नाटकापासून तिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. ‘ओळख’, ‘एक-तास भुताचा’, ‘पेहचान’ या मालिकामंध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सध्या का रे दुरावा मालिकेतील सह-कलाकार सुयश टिळकसोबत ‘स्ट्रॉबेरी’ हे सुरूचीचं नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे.

अभिनेत्री सुरूची अडारकरला वाढदिवसानिमित्त आणि पुढील यशस्वी वाटचालीकरता मराठी धमाल डॉट कॉमतर्फे हार्दिक शुभेच्छा!